कवी विं. दा. करंदीकरांचा मान ठेवून…
शीर्षक - 'पण उपयोग काय त्याचा ?'
देणाऱ्याला भाव नाही,
ना वेध नजरेचा ;
रचना झाली सुरेखा झाली !
पण उपयोग काय त्याचा ?
व्याह्यात पत्रकारीतेचा
घालीत घोळ बसले;
इंद्राणी, राधेमा आणि राखी !
पण उपयोग काय त्याचा ?
सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न असते;
कांदे महागले, मांस बंद साले
मग उपयोग काय त्याचा ?
जमली सेना थाटला पक्ष,
शस्त्रे सुसज्ज झाली;
भाऊ भाऊ भांडत बसले
आता उपयोग काय त्याचा ?
'ऐश्वर्य' प्राप्त झाले,
म्हणून करावे म्हंटलं दान
'भाईं' ना मिळाला जामीन !
आता उपयोग काय त्याचा ?
स्वातंत्र्याची अडुसष्ट वर्षे,
सगळीकडे म्हणे सुबत्ता;
जो तो गळा कापतोय
मग उपयोग काय त्याचा ?
केल्या वाऱ्या अनेक,
सेल्फ्या बऱ्याच काढल्या ;
सीमेवर गोळीबार, दौऱ्यावर पंत,
पण उपयोग काय त्याचा ?
दसऱ्याला सोने,
गणपतीला दागिने;
शेतकरी राजा मरतोय
पण उपयोग काय त्याचा ?
- ©अद्वैत परांजपे
2 comments:
सूंदर
shabbas!
Post a Comment