एका अनामिक कवी चा मान ठेवून
भेट कधी थेट नसते
कधी ती whatsapp वर असते
कधी facebook वर असते
कधी कधी नुसतंच ping असते
भेट कधी 'वस्तु' नसते
फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केलेली
अशी भेट कधी देणगी नसते
क्रृतज्ञापूर्वक नाकारलेली
भेट कधी 'धमकी' नसते
poke....करून दटावलेली
"poke back चालेल पण
chat नको " म्हणून सुनावलेली...
भेट थोरा-मोठ्यांची असते
चार लोकात कौतुकाने मिरवते....
भेट दोन बाल-मित्रांची असते
फार वर्षांनी भेटल्यावर instagram चा अंदाज घेत तपासलेली.....
भेट कधी नसते अवघडलेली
अचानक 'हाक' मारल्या सारखी....
भेट कधी नसते मनमोकळी
मनसोक्त chatting रंगवलेली....
भेट कधी नसते गुलदस्त्यातली
कट-कारस्थान रचण्यासाठी....
online असू तर जाहीरपणे
नाहीतर असते offline दाखवून टाळण्यासाठी !!!
भेटते कधी पहिली- वहिनी
पुढल्याची ओढ वाढवणारी
भेट मग नेहेमीची ठरते.....
कोरड्या जखमेला खाजवणारी
भेट कधी अपुरी नसते
intenet pack संपल्यासारखी
भेट कधी नसते कंटाळवाणी
download स्पीड पाहुन ढकलल्या सारखी....
भेट कधी चुकुन घडते
पण केलेली comment पुरून उरते
भेट कधी 'संधी' असते
निसटून पुढे निघून जाते.....
भेट कोवळ्या प्रेमीकांची
लाज कसली facebook वर
भेट ही राजकारणातल्या मतांची असते
हक्क सांगण्यासाठी...पेजेस वर!!!
भेट ...घडते आकस्मिक
विधीलिखीत...काळाशी ...
भेट कधी 'उपरोधिक' असते
न टाळता येण्याजोगी....
भेट एखादी गुरुवारची (TBT) असते
नको त्या गोष्टी पेश करते....
भेट मजेशीर भूतकाळातली
.....हसवून हसवून लाज आणते
भेट ... बऱ्याचदा आपलीच आपल्याशी
सेल्फी काढलेल्या...स्वत:शी !!!
likes comments आणि DP च्या हौशी...
forwads करून मिळवलेल्या कौतुकाशी
प्रत्यक्ष भेट नसली तरी
काय झालं आठवण तर आली
पटकन scroll करून टाकलं तरी
वाचताना थोडीशी मजा तर आली
- ©अद्वैत परांजपे
Friday, September 25, 2015
Tuesday, September 15, 2015
कवी विं. दा. करंदीकरांचा मान ठेवून…
शीर्षक - 'पण उपयोग काय त्याचा ?'
देणाऱ्याला भाव नाही,
ना वेध नजरेचा ;
रचना झाली सुरेखा झाली !
पण उपयोग काय त्याचा ?
व्याह्यात पत्रकारीतेचा
घालीत घोळ बसले;
इंद्राणी, राधेमा आणि राखी !
पण उपयोग काय त्याचा ?
सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न असते;
कांदे महागले, मांस बंद साले
मग उपयोग काय त्याचा ?
जमली सेना थाटला पक्ष,
शस्त्रे सुसज्ज झाली;
भाऊ भाऊ भांडत बसले
आता उपयोग काय त्याचा ?
'ऐश्वर्य' प्राप्त झाले,
म्हणून करावे म्हंटलं दान
'भाईं' ना मिळाला जामीन !
आता उपयोग काय त्याचा ?
स्वातंत्र्याची अडुसष्ट वर्षे,
सगळीकडे म्हणे सुबत्ता;
जो तो गळा कापतोय
मग उपयोग काय त्याचा ?
केल्या वाऱ्या अनेक,
सेल्फ्या बऱ्याच काढल्या ;
सीमेवर गोळीबार, दौऱ्यावर पंत,
पण उपयोग काय त्याचा ?
दसऱ्याला सोने,
गणपतीला दागिने;
शेतकरी राजा मरतोय
पण उपयोग काय त्याचा ?
- ©अद्वैत परांजपे
शीर्षक - 'पण उपयोग काय त्याचा ?'
देणाऱ्याला भाव नाही,
ना वेध नजरेचा ;
रचना झाली सुरेखा झाली !
पण उपयोग काय त्याचा ?
व्याह्यात पत्रकारीतेचा
घालीत घोळ बसले;
इंद्राणी, राधेमा आणि राखी !
पण उपयोग काय त्याचा ?
सुगरण रांधणारी,
सुग्रास अन्न असते;
कांदे महागले, मांस बंद साले
मग उपयोग काय त्याचा ?
जमली सेना थाटला पक्ष,
शस्त्रे सुसज्ज झाली;
भाऊ भाऊ भांडत बसले
आता उपयोग काय त्याचा ?
'ऐश्वर्य' प्राप्त झाले,
म्हणून करावे म्हंटलं दान
'भाईं' ना मिळाला जामीन !
आता उपयोग काय त्याचा ?
स्वातंत्र्याची अडुसष्ट वर्षे,
सगळीकडे म्हणे सुबत्ता;
जो तो गळा कापतोय
मग उपयोग काय त्याचा ?
केल्या वाऱ्या अनेक,
सेल्फ्या बऱ्याच काढल्या ;
सीमेवर गोळीबार, दौऱ्यावर पंत,
पण उपयोग काय त्याचा ?
दसऱ्याला सोने,
गणपतीला दागिने;
शेतकरी राजा मरतोय
पण उपयोग काय त्याचा ?
- ©अद्वैत परांजपे
Subscribe to:
Posts (Atom)